पुणे _ प्रतिनिधी
नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात (उर्फ ‘कॅप्टन’) (Ashok Kharat) प्रकरणात समोर येणारे आरोप दिवसेंदिवस गंभीर आणि अस्वस्थ करणारे ठरत आहेत. (Captain Kharat) महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांसोबतच त्याच्या अघोरी, मानसिक दबाव व अंधश्रद्धेच्या धोरणांची धक्कादायक माहिती उघड होत आहे.
“देवाचा अवतार” म्हणून महिलांचा (Women Exploitation) भावनिक शोषणखबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी दिलेल्या मुलाखतीत खरातच्या कारनाम्यांचा भयावह पैलू सादर केला आहे. खेमनार यांच्या मते, खरात स्वतःला “देव” किंवा “कृष्णाचा अवतार” असल्याचे विश्वास देऊन महिलांचा विश्वास मिळवत असे. जीवनातील समस्या सोडवण्यासाठी विशेष विधी,(Superstition Scam) “योनी शुद्धीकरण” अशा कटक शब्दांचा वापर करून तो महिलांना मानसिकदृष्ट्या तयार करत असल्याचा आरोप आहे.
गुंगी व अत्याचाराची पद्धतयाच (Nashik Crime) विधींच्या नावाखाली तो महिलांना पेढा, कडवट–खारट पाणी व इतर पेय देत असल्याचे आरोप आहेत. यामुळे अनेक वेळा गुंगी व अर्धबेशुद्ध अवस्था येत असल्याचे सांगितले जाते. या अवस्थेचा फायदा घेऊन तो महिलांवर लैंगिक अत्याचार करत होता, असा दावा आहे. “नकार दिल्यास वाईट परिणाम होतील” यासारखा धोका दाखवून त्यांना या कृत्यांसाठी भाग पाडले जात होते, असा संशय आहे. (Yoni Purification)
अंधश्रद्धा, ब्लॅकमेलिंग व अघोरी पद्धतींचा आरोपतपासातून असा दावा आहे की खरात अंधश्रद्धा, भीती व मानसिक दबाव यांचा वापर करून महिलांना जाळ्यात अडकवत असे. त्याच्याकडे अनेक प्रभावशाली व्यक्तींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व पुरावे होते, ज्यांचा वापर तो ब्लॅकमेलिंग व आपला रसूख वाढवण्यासाठी करत असल्याचा आरोप आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, तर सर्व दाव्यांची अधिकृत तपासात खरंच पडताळणी सुरू आहे.
