Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येसाठी मेट्रो, पाणीपुरवठा आणि नदी पुनरुज्जीवनाचा मोठा कृतीआराखडा

पुणे -प्रतिनिधी

उद्योगनगरी पिंपरी‑चिंचवडमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी समस्या तीव्र झाल्या असून राज्य सरकारने विधानमंडळात महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांची घोषणा केली आहे. शहराचा विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता, मेट्रो विस्तार, पाणीपुरवठा आणि नदी पुनरुज्जीवन या तीन आधारभूत मुद्द्यांवर सरकारने आपला कृतीआराखडा स्पष्ट केला आहे. (Pimpri Chinchwad)

मेट्रो विस्ताराचे उद्दिष्टआमदार उमा खापरे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे आश्वासन दिले. पिंपरी–चिंचवडची लोकसंख्या सुमारे 40 लाखांच्या जवळ गेल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने पिंपरी ते निगडी या मेट्रो विस्तारप्रकल्पाचे काम जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीतून शहराला मोठी सुटका मिळण्याची शक्यता आहे.

नद्या पुनरुज्जीवन आणि पाणीतुटपिंपरी–चिंचवडवरून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांच्या प्रदूषणाचा तागडा वाढला असून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकारने कार्यक्रम आखले आहेत. यासोबतच शहराला सध्या अंदाजे 750 एमएलडी (Million Litres per Day) पाण्याची गरज आहे, तर वर्तमान पातळीवर केवळ जवळपास 620 एमएलडी पाणीपुरवठा सुरू आहे. 130 एमएलडीचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी उपाययोजना युद्धपातळीवर सुरू केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *