पुणे -प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील खडकी (Khadaki) येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला घटना कोणाला सांगितल्यास कापून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अमोल छगन शिंदे या तरुणाला दौंड पोलिसांनी अटक केली. १२ डिसेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत खडकी (Khadaki) ग्रामपंचायत हद्दीत दुपारी चार वाजेपर्यंत आरोपीने पीडितेचा किराणा दुकानाच्या रस्त्यावर तसेच ओळखीच्या व्यक्तीच्या घरासमोर पाठलाग केला.(Daund News)
आरोपीने तुझ्याशी लग्न (Marriage) करायचं असं म्हणत पीडितेचा हात पकडून मिठी मारली आणि तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असं कृत्य केलं, अशी फिर्याद अल्पवयीन मुलीने दौंड पोलीस ठाण्यात (Daund Police Station) दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी भा.न्या.स. कलम ७४, ७८ तसेच पॉस्को (Pocso) कायदा कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अमोल शिंदे (Amol Shinde )याला तात्काळ अटक केली. पोलिस उपनिरीक्षक उगले (PSI Ugale) यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.(Pune Crime)
