पुणे -प्रतिनिधी
पुण्यात सायबर (cyber ) गुन्ह्यांचे प्रमाण गेल्या वर्षभरात झपाट्याने वाढले असताना, आता सुरक्षित समजल्या जाणाऱ्या व्हॉट्सअॅपचा गैरवापर होत असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येवलेवाडी (yewalewadi )परिसरातील एका ३३ वर्षीय विवाहित महिलेला वारंवार व्हॉट्सअॅप कॉल करून त्रास देणाऱ्या सोन रूपचंदानीवर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने २८ जानेवारीपासून सुरू केलेल्या कॉल्समध्ये “मला तुझ्याशी लग्न करायचंय, तू तुझ्या पतीला आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये,” अशा अवाजवी आणि अश्लील मागण्या केल्या. वारंवार फोन करून महिलेच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत त्याने तिला मानसिकदृष्ट्या त्रस्त केले. या प्रकारामुळे महिलेच्या कुटुंबीयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.येवलेवाडी पोलिसांनी ( yewalewadi police station) या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असून, आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. सध्या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपीच्या मोबाईल रेकॉर्डची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, त्याने अशाच प्रकारे इतर महिलांना त्रास दिला आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.
पुण्यात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोशल मीडिया आणि कॉलिंग ॲप्सचा गैरवापर करणाऱ्या अशा विकृत मानसिकतेवर कडक कारवाई करण्याची मागणी समाजातून होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी अशा संशयास्पद कॉल्सची लगेच तक्रार नोंदवावी, जेणेकरून वेळीच कारवाई करता येईल.
Pune crime …तुझ्यासोबत लग्न करायचय मुलांना सोडून …. व्हाट्सअप कॉलने विवाहित महिलेला त्रास देणारा तरुण कोण ? पुण्यातील येवलेवाडी पोलिस ठाण्यातील घटना
