पुणे -प्रतिनिधी
पुण्यातील भारती विद्यापीठ (Bharati Vidhyapith Police Station) परिसरात एका महिलेवर सामूहिक बलात्कार (Rape) करून तिची क्रूर हत्या (Murder) करणारा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी महिलेला जबरदस्तीने रिक्षात बसवून निर्जन दगडाच्या खाणीपर्यंत नेले, तिथे आळीपाळीने अत्याचार केला आणि काठीने मारहाण करून एकाने तिला खाणीत ढकलून दिले, अशी माहिती समोर आली आहे .
या घटनेमुळे पुणे (Pune Crime)शहरात खळबळ उडाली असून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या संयुक्त तपासात सराईत गुन्हेगार असलेल्या तिघा आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे. ओळख पटू नये म्हणून त्यांनी रिक्षाचे हूडही बदलले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून महिलेचा मृतदेह (Death Body ) पोस्टमार्टमसाठी पाठवला असून तिची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गुन्हा दाखल (Crime News) झाल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही बेड्या (Arrest )ठोकल्या असून त्यांच्यावर याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपांची कसून चौकशी सुरू असून या भीषण प्रकरणाचा सखोल तपास गुन्हे शाखा करीत आहे .(Pune Police )
