पुणे -प्रतिनिधी
22 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.15 ते 7.50 या वेळेत चिल्ड्रन पार्कजवळील चैतन्य पार्क, साईदर्शन बी विंग येथे धर्मेंद्र अमरेंद्र झा (53) यांच्या फ्लॅटची कडी-लॅच तोडून आरोपींनी घरफोडी केली. बेडरूममधील कपाट आणि लॉकर फोडून 57,500 रुपये रोख आणि चांदीची नाणी लंपास केली गेली.(Pune Crime)
घरफोडी करून मोटारसायकलवर पळ काढत असताना नागरिकांनी आरोपींचा पाठलाग केला. यात सागरसिंग सुरजसिंग ऊर्फ ‘फंटयास्टिक’ बावरी (अंधरेले), रा. जालना याने चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवला. झटापटीत सचिन ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या हाताला चाकूचा वार लागला तर ध्वजशेर शाही यांना किरकोळ जखम झाली.पोलिसांनी दुपारी 4.50 वाजता अंधरेलेला अटक केली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. (Bhosari)
त्याचा साथीदार फरार असून विशेष पथक शोध घेत आहे. आरोपीवर जालना जिल्ह्यात 15 हून अधिक घरफोडी गुन्हे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 79/2026 नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे तपास करत आहेत.
