Pune crime : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करून लुटणारे सराईत गजाआड

पुणे – प्रतिनिधी

लोणी काळभोर (loni kalbhor )येथे ८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता वॉकिंगसाठी बाहेर पडलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी महादेव रामभाऊ कापसे यांच्यावर चार जणांच्या टोळक्याने मोटारसायकलवरून हल्ला करून मोबाईल लुटला. कापसे हे रिव्हरव्ह्यू सिटी मागील रेल्वे लाईन परिसरात मित्रासोबत चालत होते, तेव्हा आरोपींनी शिवीगाळ करत पैसे आणि मोबाईल देण्याची धमकी दिली आणि दगड, पाईप व दांडक्याने त्यांच्या डोक्यावर व अंगावर बेदम मारहाण केली, ज्यामुळे ते बेशुद्ध पडले. आरोपींनी त्यांचा   (pune crime )  सुमारे सात हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून पळून गेला.

लोणी काळभोर (loni kalbhor )पोलिसांनी फिर्याद नोंदल्यानंतर अवघ्या आठ तासांत सीसीटीव्ही फुटेज, खबऱ्याची माहिती आणि सापळा रचून चारही आरोपींना गंगानगर परिसरात अटक केली. अटक आरोपी म्हणजे सुजल बाळासाहेब झेंडे वय २० वर्षे रा. गुरुदत्त कॉलनी भेकराईनगर, शुभम संजय चव्हाण वय २४ वर्षे रा. साडेसतरा नळी गोसावी वस्ती, ओंकार अशोक चिंतलु वय ३१ वर्षे रा. आनंदनगर सोसायटी जुना कॅनल शेजारी आणि अभिजीत सतीश सोनकांबळे वय २० वर्षे रा. पांडवदंड रोड सात देवी मंदिरामागे कदमवाकवस्ती ता. हवेली. चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल केला आणि पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेला मोबाईल  (pune crime ) तसेच दोन दुचाकींसह एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.भारतीय न्याय संहिता कलम ३५२, ३०९(६) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक गुन्हे स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव  (PSI anil jadhav )व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले.

न्यायालयाने आरोपींना गुरुवार ता. १२ फेब्रुवारीपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुणे शहर पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे (DCP Rajkumar Shinde ) व सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाने झालेल्या या वेगवान कारवाईमुळे लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी सराहली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *