Pune Crime : पुण्यात आंतरराज्यातून मेफेड्रोनची तस्करी….चार कोटींचे मेफेड्रोन जप्त; सहा जण जेरबंद

पुणे -प्रतिनिधी

खराडी पोलिसांनी एमडी (मेफेड्रॉन) (Mephedrone)अंमली पदार्थाच्या मोठ्या रॅकेटवर छापा ठोकीत एकूण १९६० ग्रॅम MD जप्त करून सहा आरोपींना बेड्या ठोकल्या. यात ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज समाविष्ट आहे, ज्यात रोख रक्कम, मोबाइल फोन आणि फॉर्च्यूनर वाहनाचा समावेश आहे .
३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ४.३५ वाजता खराडीतील (Kharadi), ईओन फेज २ जवळ पांढऱ्या स्विफ्ट कारमधून २७ ग्रॅम MD (किंमती १२.४१ लाख) विक्रीसाठी नेले जात असल्याचे उघड झाले. खराडी पोलीस स्टेशनात गुन्हा क्र. २१/२०२६ (एनडीपीएस कलम ८(क), २१(ब), २९) दाखल करून मोतीसिंह राजपुरोहित (२८, वाघोली) आणि हरीष रामदेवासी (२२, वाघोली) (Wagholi) यांना अटक करण्यात आली (Mephedrone)

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खराडी PI संजय चव्हाण यांच्या नेतृत्वात दोन तपास पथकांनी राजस्थान कनेक्शन उघड केले. ७ फेब्रुवारीला योगेश उर्फ मनीष बिष्णोई (३०, जोधपूर) कडून १५१ ग्रॅम MD (३०.२० लाख) आणि त्याच्या मावस भाऊ सचिन उर्फ एसके बिष्णोई (२०, जोधपूर) कडून ४.६५ लाख रोख रक्कम जप्त. तसेच अमित सुनिल घुले (४०, मांजरी बुद्रुक) कडून ३९८ ग्रॅम MD आणि फॉर्च्यूनरसह १.०२४ कोटींचा माल हस्तगत
९ फेब्रुवारीला अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या PI पंडीत रेजितवाड यांच्या नेतृत्वात पाच तपास पथके राजस्थान रवाना. ११ फेब्रुवारीला मुख्य वितरक रतनलाल जाठ (२०, बालोतरा) कडून १३८४ ग्रॅम MD (२.७६८ कोटी) जप्त. १२ फेब्रुवारीला फरार रामकरण जाट उर्फ चौधरी (जोधपूर) ताब्यात (Mephedrone)

हि कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar), उपायुक्त सोमय मुंडे (DCP Somay Munde), निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाने खराडी, अंमली पदार्थ विरोधी पथक, वाघोली, विमानतळ (Vimantal ) पोलिसांनी संयुक्त कारवाई करून हे रॅकेट उद्ध्वस्त केले. आरोपी गेल्या वर्षापासून सक्रिय असल्याची कबुली. पुढील तपास API रविंद्र गोडसे (API Ravindra Godse)करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *