पुणे -प्रतीनिधी
कोथरूड (Kothrud Assault) परिसरात जुन्या वादातून मारहाणीची घटना उघडकीस आली. श्रावण धारा वसाहत, न्यू शांतीनगर येथील धनंजय सोसायटीत हा प्रकार घडला असून, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV Footage) कैद झाली आहे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून सूरज कदम नावाच्या व्यक्तीने मारहाण केल्याचा आरोप आहे. (Dhanan jay Society)
तो एका प्रतिष्ठित व्यक्तीचा जवळचा असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारहाण स्पष्ट दिसते, असा दावा केला जात आहे.सोसायटीत कोयत्याने तोडफोडचार दिवसांपूर्वी तेजस कांबळे आणि साथीदारांनी सोसायटीतील घरांवर कोयत्याने तोडफोड केली. राहुल गायकवाड याला सोसायटीत घुसून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. कोथरूड पोलीस स्टेशनला तेजस कांबळेसह सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
मात्र, सूरज कदमवर ((Suraj Kadam)) अद्याप कारवाई झालेली नाही, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. “पोलिसांवर दबाव आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.
