Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारकडून ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी eKYC दुरुस्तीची संधी

पुणे -प्रतिनिधी

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana ) योजनेत eKYC प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. ही सुविधा केवळ पूर्वी अर्ज भरलेल्या आणि त्यात चूक असलेल्या महिलांसाठी आहे. चुकीचे eKYC पूर्ण न झाल्यास ₹१,५०० चा महिन्याचा लाभ मिळणार नाही.दुरुस्तीसाठी पोर्टलवर जाण्याचे आवाहन पोर्टलवर आता स्पष्ट मेसेज दिसतोय: “ही eKYC फक्त चुकीचे पर्याय निवडणाऱ्या लाभार्थ्यांसाठी.” आधार-जोडलेले बँक खाते आणि योग्य eKYC अनिवार्य आहे. त्रुटींमुळे रखडलेल्या अर्जांची दुरुस्ती केल्यावरच हप्ते खात्यात येतील. (Ladki Bahin Yojana)

सरकारने सर्व संबंधित महिलांना तात्काळ पोर्टलवर जाऊन दुरुस्ती करण्याचे आवाहन केले आहे. ३१ डिसेंबर २०२५ नंतर eKYC करता येणार नाही.चार महिन्यांचे ₹६,००० एकाचवेळी?
डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च अशा चार महिन्यांचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये आला, पण पडताळणीनंतर डिसेंबरपासून रखडले. नवीन आर्थिक वर्षात हे हप्ते एकाचवेळी येतील, अशी खात्रीलायक माहिती मिळाली. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला हप्ता येण्याचे सरकारचे आश्वासन होते, पण रखडलेल्या रकमा लवकरच मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *