Land Fraud :१२ वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीने विकली कोटीची जमीन ? आगाखान पॅलेससमोर ११ कोटींचा जमीन घोटाळा .. काय आहे नेमकं प्रकरण

पुणे -प्रतीनिधी

पुण्यातील येरवडा परिसरात (Yerwada ) आगाखान पॅलेससमोर (Aagakhana Palace )११ हजार ६०० चौरस फुटांच्या प्लॉटवर २०१२ मध्ये मृत्यू पावलेल्या ब्रिज किशन कोतरू यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी-विक्री व गहाणखत नोंदवल्याचा घोटाळा उघडकीस आला .
दिल्लीतील व्यावसायिक अभिनव कोतरू (वय ५०) (Abhinav Kotaru)यांच्या तक्रारीवरून येरवडा पोलीसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, ३-४ डिसेंबर २०२४ रोजी औंध दुय्यम निबंधक कार्यालयात एस.के. अँग्रोफूड टेक प्रा. लि. कंपनीच्या प्रतिनिधींसह तोटे व्यक्तीला विक्रेते म्हणून उभे करून ११ कोटींचा व्यवहार दाखवून ७०-८० लाख स्टॅम्प ड्युटी भरली गेल्याचे समोर आले (Land Fraud)
.७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्लॉटवरील वॉचमनला जागा रिकामी करण्याचा प्रयत्न झाल्याने हा प्रकार उघड झाला, जरी २०२५ मध्ये कायदेशीर वारसांच्या नावावर फेरफार झाला होता  निबंधक कार्यालयातील ओळख पडतळणी व बायोमेट्रिक तपासणीत त्रुटी असल्याच्या शंकेखाली वरिष्ठ पीआय अंजुम बागवान (PI Anjum Bagwan) यांच्या नेतृत्वाखाली सीसीटीव्ही, बँक व्यवहार व दस्तऐवजांची छाननी सुरू आहे
. कोट्यवधी मालमत्तांवरील बनावट व्यवहार वाढत असल्याने नागरिकांना कागदपत्रे नियमित तपासण्याचा इशारा देण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *