india Vs Pakistan : २ षटकांत ३१ धावांची लयलूट; पाक पराभवानंतर सासऱ्याचा जावयाला सल्ला – “बेंचवर जा!”

पुणे -प्रतिनिधी

वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानचा (india Vs Pakistan) सहजासहजी पराभव केल्यानंतर पाक क्रिकेटमध्ये भूकंप सुचवला आहे. माजी कर्णधार शाहीद अफ्रिदीने बाबर आझम, शाहीन अफ्रिदी आणि शादाब खानसह वरिष्ठ खेळाडूंवरून वैचार्य सुरू केले आहे.अफ्रिदीने आपल्या जावयाला देखील सोडले नाही. समा टीव्हीला बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले,

“जर मला निर्णय घ्यायचा असेल तर मी बाबर, शाहीन (Shahin) आणि शादाब (Shadab) या तिघांना बेंचवर बसवेन. नवीन युवा खेळाडूंना संधी देईन आणि नामिबियाविरुद्धच्या सामन्यात त्यांना खेळवून आत्मविश्वास देण्याची गरज आहे.””या खेळाडूंना वर्षानुवर्षे संधी मिळाली, पण मोठ्या सामन्यांत अपयशी ठरत आहेत. त्यांना आराम देऊन ज्युनियरांना आजमावण्यात हरकत काय?” असेही अफ्रिदी यांनी जोरदारपणे सांगितले.भारताविरुद्धच्या सामन्यात शाहीन शहा अफ्रिदी सर्वाधिक महागडे गोलंदाजी करणारा गोलंदाज ठरला. त्याने २ षटकारात ३१ धावा दिल्या,

विशेषतः शेवटच्या षटकात १६ धावा खाव्या लागल्या. यामुळे भारताने १७० धावांचा टप्पा पार केला. शादाब खानने (Shadab Khan) १ षटकात १७ धावा दिल्या आणि फलंदाजीत १४ धावांवर बाद झाला, तर बाबर आझमही अपयशी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *