पुणे -प्रतिनिधी
वैभव नंदेश शिंदे (२९, शेती) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवार रात्री आठ वाजता राजेंद्र शिंदे याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर उत्तेजित मेसेज टाकला, ‘राजू शिंदेंच्या वस्तीत कोणी येऊ नका, पैसे मागणाऱ्यांना बांबूचे फटके पडतील.’ वैभव यांनी उत्तरात ‘विचार करण्याची वेळ आली आहे’ असे लिहिले. त्यावर अकरा वाजता राजू शिंदेने स्वतःला ‘वस्तीचा बाप’ म्हणून धमकावले, ‘मारून टाकीन, कापून टाकीन.’ वैभव काही बोलले नाहीत आणि घरी परतले.
साडेबारा वाजता राजेंद्र शिंदे (Rajendra Shinde) घरासमोर दाखल झाला आणि दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या, दरवाजा व दाजी महेश जगताप यांच्या दुचाकीवर लोखंडी रॉडने वार केले. भांडणाचा आवाज ऐकून रोहीत शिंदे, आई शकुंतला व बहिण शिल्पा धावले तेव्हा राजेंद्र व त्याचा मेहुणा यांनी रोहीतला डोक्यात, पाठीत, हातावर रॉडने मारले. आदेश तुषार शिंदे व सार्थक राजेंद्र शिंदे यांनी बांबूने पाठीवर थेट हल्ला केला. शिल्पा व शकुंतला यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली.
