Saswad : सासवडमध्ये जमिनीच्या वादातून भावनेने केला भावावर गोळीबार … नेमकं काय आहे प्रकरण

पुणे -प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील ऊदाचीवाडी येथे अवघ्या एका गुंठा जमिनीसाठी नातेवाईकांमधील वाद भडकला आणि गोळीबार (gun firing) झाला. वाघापूर प्रकरणाची चर्चा जोरात असतानाच ही धक्कादायक घटना घडली.फिर्यादी विकी मुरलीधर रजपूत (३०, रा. ऊदाचीवाडी) यांची भोसे (चाकण-वाकड) येथे एक गुंठा जमीन आहे. मावसभाऊ (brother) पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड आणि काका उत्तरसिंग रामकुमार राठोड यांच्याशी गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. पूर्वी चाकण येथे वडापाव विकणारे विकी नातेवाईकांच्या त्रासामुळे दोन महिन्यांपासून आईकडे ऊदाचीवाडीत राहत होते.(Saswad)

आरोपी पृथ्वीराजने फोनवर जमीन नावावर न केल्यास जीव घेण्याच्या धमक्या दिल्या. मंगळवारी ऊदाचीवाडीत धावत आला आणि गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. सुदैवाने नेम चुकला, विकी बचावले.विकी यांनी सासवड (saswad) पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पृथ्वीराज व उत्तरसिंग राठोड यांच्यावर गुन्हा दाखल केला. (gun firing) पुरंदरमधील सततच्या गोळीबारांमुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात; नागरिकांमध्ये भीती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *