Spa : वेश्याव्यवसाय रॅकेटचा मास्टरमाइंड अखेर गजाआड ; स्पा च्या नावाखाली चालवायचा तो व्यापार .. आरोपीची नागपूर जेलमध्ये रवानगी

पुणे- प्रतिनिधी

पुणे शहरात मसाज (Spa) सेंटरच्या नावाने देहविक्रीचे जाळे विणाऱ्या मुख्य सूत्रधार धनराज शामराव जाधववर (dhanraj shamrao jadhvavar) पोलिसांनी कडक कारवाई केली. एमपीडीए कायद्यानुसार त्याला वर्षभरासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई स्पा माफियांना इशारा आहे.
धनराजवर पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे शहरांत अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत. तो तरुणींना प्रलोभन देऊन वेश्याव्यवसाय करवित होता. यापूर्वी १४ जानेवारी २०२५ ला स्थानबद्ध झाल्यानंतर फरार झाला होता. वानवडी येथून ७ फेब्रुवारीला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.त्याचे जाळे पुणे, संभाजीनगर, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईपर्यंत पसरलेले असल्याचा संशय. वानवडी पोलिस ठाण्यात (wanwadi police station)२०२४ मध्ये स्पा (Spa) सेंटरमधील देहविक्री प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
आयुक्तांचा इशारा: “स्पा-मसाज सेंटरच्या आडून गैरप्रकार चालवणाऱ्यांवर स्थानबद्धतेसारख्या कठोर कारवाया करून कारागृहात पाठवू,” – अमितेश कुमार,(cp amitesh kumar) पोलिस आयुक्त.या धोरणामुळे अनेक स्पा व्यावसायिकांनी व्यवसाय बंद केला आहे. पोलिस स्पा माफियांवर सतत कारवाई करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *