Pune Crime : महाशिवरात्रीच्या दिवशी देव दर्शनाला निघालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

पुणे -प्रतिनिधी

महाशिवरात्रीनिमित्त लोणी काळभोर (Loni Kalbhor )परिसरात महादेव दर्शनासाठी गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली. ही घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर भागात रविवारी (१५ फेब्रुवारी) संध्याकाळी घडली असून, मुलीच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलीस माहितीनुसार,(Pune Crime) पीडित कुटुंब या परिसरात राहते आणि मुलगी सातवीपर्यंतच शिक्षण घेऊन सोडले होते.(Kidnap)

रविवारी महाशिवरात्र (Mahashivratri) उत्सवासाठी “मंदिरात जाऊन येते” असे सांगून ती घराबाहेर पडली, पण संध्याकाळ उलटूनही ती घरी परतल्यान नाही. आई-वडिलांनी नातेवाईक, मित्रमैत्रिणींकडे शोध घेतला, तथापि तिचा काही पत्ता लागला नाही.अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून मुलीचे अपहरण केल्याचा संशय वडिलांनी व्यक्त करत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल (Crime) करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील (Crime Pi Smita Patil )यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पीआय सोमनाथ नाळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *