Baramati : आई मला माफ कर… त्या मला ब्लॅकमेल करतात .. आधी तिने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर बहिणीच्या साथीने रचला फिल्मला ही लाजवेल असा प्लॅन… शेवटी तरुणीने आयुष्य …

पुणे -प्रतिनिधी

रुई बयाजीनगर येथे २३ वर्षीय विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (Vikram Kolape ) याने प्रेयसी सृष्टी विकास मते, तिच्या बहिणी श्रृती व वडिलांच्या मानसिक छळ व ब्लॅकमेलिंगला कंटाळून १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घराच्या किचनमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. पाच वर्षांच्या प्रेमसंबंधात (Love Relationship )लग्नाचे आमिष दाखवून नकार देणाऱ्या सृष्टीने २७ डिसेंबर २०२५ पासून फोनवर त्रास देणे व ५ जानेवारी रोजी पुण्यात बोलावून मोबाईलमधील फोटो-चॅट डिलीट करून जीवे मारण्याची धमकी देण्याचे आरोप मामा सत्यवान इंगळे यांच्या तक्रारीत आहेत.( Baramati )

सुसाईड नोटमध्ये (Sucide Notes) विक्रमने “आई मला माफ कर… ब्लॅकमेल (Blackmail)व मानसिक त्रासामुळे हा निर्णय” असे लिहून छळाचा उल्लेख केला असून, विकास मते यांनी नातेवाईकांना दमदाटी केल्याचा आरोप आहे. बारामती तालुका पोलिसांनी BNS कलम १०८, ३५१(२), ३५१(३), ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, सुसाईड नोट, कॉल रेकॉर्ड, मोबाईल व सीसीटीव्ही तपास सुरू आहे. आरोपी तिघे फरार असून, पीएनआय चंद्रशेखर यादव (Chandrashekhar Yadav)तपास करीत आहेत (Baramati)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *