Pune Crime News : आईच्या मित्राने कारमध्ये 13 वर्षीय मुलीवर केला लैंगिक अत्याचार ; कोणाला सांगितले तर बघून घेईन … नराधम गजाआड

पुणे -प्रतिनिधी

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात विश्वासघाताची एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीण असलेल्या विधवा महिलेच्या १३ वर्षीय मुलीवर तिच्या जिवलग मित्राने, २९ वर्षीय ज्ञानेश्वर रायरीकरने, शाळेत सोडण्याच्या बहाण्याने घोर विश्वासघात केला. कौटुंबिक ओळखीमुळे आईचा आरोपीवर पूर्ण विश्वास होता, मात्र त्याचा फायदा घेत त्याने मुलीला आपल्या कारमध्ये बसवली आणि पुण्याच्या प्रसिद्ध डीपी रोड (DP Road) परिसरात भररस्त्यात गाडी थांबवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे, तर “हे कोणाला सांगितलं तर तुझं आणि तुझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त करून बघीन,” अशी भयंकर धमकी देत त्याने अल्पवयीन मुलीला गप्प बसवलं.आईच्या सतर्कतेमुळे फुटलं भांडं (PUne Crime News)
शाळेच्या वेळेत बदल झाल्याचं आईला जाणवलं. मुलगी सकाळी ७ वाजण्याऐवजी साडेसात वाजता शाळेत पोहोचली होती. घरी आल्यावर उशीरा होण्याबाबत विचारलं असता मुलगी प्रचंड घाबरली आणि तिची अवस्था बघून आईला संशय आला. विश्वासात घेऊन सत्य विचारलं तेव्हा मुलीने रडकुंडीला येत सविस्तर आपबिती सांगितली. धक्कादायक प्रकार समजताच आईने वेळ न घालवता वारजे पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार नोंदवली.पोलिसांची तत्काळ कारवाई(Crime News)
वारजे पोलिसांनी (Warje Police Station) घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई केली. आरोपी ज्ञानेश्वर रायरीकरविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावली गेली. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, आरोपीचं वाहन आणि इतर पुराव्यांची कसून तपासणी सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही उलगडा होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *