MSRTC NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! सवलती मिळवण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य; अन्यथा पूर्ण तिकीट दर भरावा लागेल. वाचा नियम

पुणे -प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवास सवलतींना डिजिटल वळण दिले असून, आता महिला (५० टक्के सवलत), ज्येष्ठ नागरिक (१०० टक्के सवलत), विद्यार्थी, दिव्यांगांसाठी आधार कार्ड किंवा ओळखपत्र पुरणार नाही. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) नसेल तर पूर्ण तिकीट दर भरावा लागेल. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने लागू झालेल्या या नियमामुळे रोखविरहित व्यवहार, अचूक नोंद आणि पारदर्शक प्रतिपूर्ती साध्य होईल.कार्डाची किंमत आणि वैशिष्ट्ये
NCMC कार्डची किंमत १९९ रुपये (जीएसटीसह) असून, जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत मिळेल. हे प्री-पेड वॉलेटसारखे असून, किमान १०० रुपये बॅलन्स (५० रुपयांच्या पटीत रिचार्ज) आवश्यक आहे. बस डेपो, ईटीएम मशीन, अॅप किंवा वेबसाइटवरून सहज रिचार्ज शक्य असले, तरी सुरुवातीला ग्रामीण प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता आहे.

ग्रामीण प्रवाशांचा संशयप्रशासनाने पारदर्शकतेसाठी हा निर्णय घेतला असला, तरी रांगेत कार्ड काढणे, रिचार्ज करणे आणि तांत्रिक अडचणींमुळे महिला व ज्येष्ठांना ससेहोलपट होईल. “आधार पुरेल इतपत सोपे का नाही,” असा सवाल उपस्थित होत आहे. तरीही कॅशलेस प्रवासाला चालना मिळेल आणि बनावटी सवलतींवर आळा बसेल.सवलती कशा मिळतील?
कार्ड टॅप करून तिकीट मिळेल आणि यंत्रनियंत्रित नोंद होईल. लवकरच डेपोमध्ये नोंदणी केंद्रे सुरू होणार असून, ईबिक्स आणि एनएसडीएल बँकेशी करार आहे. प्रवाशांनी तात्काळ कार्डसाठी अर्ज करावा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *