Navale Bridge Accident : नवले पूल की मृत्यूचा सापळा? तब्बल 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्या! तर रक्ताच्या थारोळ्यात एकाचा जागीच मृत्यू

पुणे -प्रतीनिधी

पुणे-सोलापूर महामार्गावरील नवले पूल (Navale Bridge Accident) परिसरात शुक्रवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास भरधाव ट्रकने सहा वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार आश्पाक हनीफ चौधरी (Ashpak Chaudhari)(३६, रा. कोंढवा) याला चिरडून जागीच मृत्यू झाला असून,(Pune SolapurHighway Crash) इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले.

कात्रजकडून नवलेकडे येत असलेल्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि तीव्र उतारावर पाच वाहने व एका बसला धडक देण्यास सुरुवात केली. सिग्नलवर थांबलेल्या आश्पाक यांच्या दुचाकीला शेवटी धडक बसली, ज्यामुळे ट्रकखाली अडकून त्यांचा मृत्यू झाला. चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असला तरी नर्हे पोलिसांनी (Narbe Police Arrest)ताब्यात घेतले.अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. नागरिकांनी तात्काळ मदत केली असली तरी आश्पाक हे डीएसके धायरी येथे चालक म्हणून काम करणारे होते. (Fatal Truck Collision)

नर्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, तपास जोरदार सुरू आहे. या परिसरातील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सुरक्षेच्या मागण्या तीव्र झाल्या आहेत.(Navale Bridge Accident)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *