पुणे -प्रतिनिधी
चिंचवड महानगरपालिकेत नोकरीच्या आमिषाने चाललेल्या फसवणूक रॅकेटमुळे प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. समाजमाध्यमांवर पालिकेच्या नावाने बनावट भरती जाहिराती आणि नियुक्तीपत्रे फिरवून तरुणांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले असून, सध्या कोणतीही नवीन भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.(Pimpri Chichwad Mahanarpalika)
प्रशासकीय तक्रारींनुसार, खासगी मेसेजिंग ॲप्स आणि अनधिकृत वेबसाइट्सवरून पैशांची मागणी करून उमेदवारांच्या बनावट याद्या तयार केल्या जात आहेत. सहआयुक्त मनोज लोणकर यांनी आवाहन केले की, भरतीची अधिकृत माहिती फक्त www.pcmcindia.gov.in वर उपलब्ध असते आणि कोणत्याही मध्यस्थ किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नये.(PCMC Recruitment )
या टोळीवर कठोर कायदेशीर कारवाई होणार असून, फसवणूक झालेल्यांनी तात्काळ पोलिस किंवा महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकाराने महापालिकेची बदनामी होत असल्याचा आरोप करत प्रशासनाने सतर्कतेचा बिगुल फुंकला आहे.(Pune)
