Pimpri Chinchwad : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने 32 वर्षीय महिलेचा घेतला जीव ; चाकण हद्दीतील घटना

पुणे -प्रतिनिधी

पुणे-नाशिक महामार्गाजवळील चाकण येथे भटक्या कुत्र्यांच्या भयानक हल्ल्यात (Chakan Dog Attack )३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.मूळ नांदेड येथील शोभा विजय वाघमारे (Shobha Waghmare) या महिलेसोमवारी मध्यरात्री सुमारे २ वाजता आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवरून चालत होत्या. (Pune News)

अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळीने त्यांना घेरले. स्वतःचा बचाव करण्यासाठी दगड उचलून हल्लेखोरांना भगवण्याचा प्रयत्न केला, मात्र कुत्र्यांची संख्या जास्त असल्याने त्या अपयशी ठरल्या.कुत्र्यांनी त्यांच्यावर सतत हल्ला करत शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले. सुमारे १५ मिनिटे चाललेल्या या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि शोभा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.सकाळी स्थानिकांना महिलेचा मृतदेह आढळला.(Stray Dogs Terror)

सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चाकण पोलिसांनी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची पुष्टी केली असून तपास सुरू आहे. (Nashik Highway Horror )या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. प्रशासनाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *