पुणे -प्रतिनिधी
मित्रांसोबत रविवारी पार्टीचा प्लॅन (Sunday party plan )असेल तर सावध! महाराष्ट्र सरकारच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने १५, १९ आणि २३ फेब्रुवारीला ड्राय डे घोषित केले आहेत. यंदाच्या वर्षी महाशिवरात्र आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसह समाजसुधारकांच्या जयंतीनिमित्त दारूबंदी लागणार आहे.(Dry Day In Maharashtra )
ड्राय डेचे तारखा व कारणे१५ फेब्रुवारी (रविवार):
महाशिवरात्र – धार्मिक उत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्रात बंदी.१९ फेब्रुवारी (गुरुवार): छत्रपती शिवाजी महाराज जयंती – महाराष्ट्रव्यापी ड्राय डे.२३ फेब्रुवारी (सोमवार): स्वामी दयानंद सरस्वती जयंती – मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये बंदी.काय राहील बंद?राज्य उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत वाइन शॉप्स, बार (Baar), पब, हॉटेल्स (Hotels), रेस्टॉरंट्स (Restaurants)आणि परमिट रूम (Permmit Room ) पूर्ण बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी मद्यपानासही पूर्ण मनाई असेल. उल्लंघन केल्यास कडक कारवाई होईल.(Dry Day In Maharashtra )
या ड्राय डेचा (Dry Day ) उद्देश सार्वजनिक सुव्यवस्था राखणे आणि उत्सवश्रद्धा जपणे आहे. पार्टीनिमित्त स्टॉकिंग करा किंवा नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक्सचा प्लॅन (Drink Plan )तयार करा! सुरक्षित राहा.
