पुणे -प्रतिनिधी
तरवडेवस्ती महंमदवाडी येथील गंगेभार वादव यांच्या बंद घरात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ दरम्यान कोयंडा उपसून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कमसह चार लाखांचा चोरटाही झाला होता. (PUne Crime)
वादव यांच्या फिर्यादीवर गुन्हा ३७/२०२६ दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील (Pi mnsingh Patil) व उपनिरीक्षक विनायक गुरव (PSI Vinayak Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती व सापळा रचून नाने वैभव ऊर्फ बाब्या संजय गायकवाड व पशात ऊर्फ चिक्या भारत कसबे (दोघे रा. साठेनगर, तरवडे वस्ती) यांना ताब्यात घेतले.
प्रथम उडया उडवणाऱ्या आरोपींनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली.(Crime News ) त्यांच्याकडून १५.१ ग्रॅम सोने (२.१८ लाख), २२०.६ ग्रॅम चांदी (६१,४४० रुपये), ओप्पो मोबाईल (३,००० रुपये) सह एकूण २,८३,६३० रुपयांचा माल जप्त झाला, ज्यात सोन्याचे हार, झुमके, चेन, चांदीची अंगठी, पैंजण व साखळी यांचा समावेश आहे. आरोपींना पोलीस कस्टडीत ठेवून उपनिरीक्षक गुरव तपास करीत आहेत.
