Pune Budhwar Peth : बुधवार पेठेत पुन्हा पोलिसांचा छापा ! ११ बांग्लादेशी सापडले , सहा जणांची कबुली; पेठेत नेमकं काय चाललंय?

पुणे -प्रतिनिधी

बुधवार पेठेतील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर खडक आणि फरासखाना पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली. या छाप्यात २२ महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी ११ बांगलादेशी नागरिक असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. (Pune Budhwar Peth) ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी ११ भारतीय नागरिकांनी ओळखपत्रे सादर केली, ज्यांची पडताळणी सुरू आहे. (Police raid Budhwar Peth again)

उर्वरित ११ पैकी सहा महिलांनी चौकशीत बांगलादेशी असल्याची कबुली दिली, तर इतर पाचच्या कागदपत्रांवरून त्यांचेही बांगलादेशी नागरिकत्व निश्चित झाले. पोलिसांनी वेश्यागृह सील करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला असून, मानव तस्करी आणि बेकायदा वेश्याव्यवसायाविरोधात अशा कारवाया पुढेही चालू राहतील, असे आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, महिलांच्या नागरिकत्व स्थिती, तस्करी करणाऱ्या टोळ्या, (Pune Budhwar Peth ) दलालांची भूमिका आणि आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत. परदेशी नागरिकांच्या बेकायदा वास्तव्याबाबत संबंधित विभागांना माहिती देण्यात येईल.

या इमारतीत अनेक वेश्यागृह चालवली जात असल्याने संपूर्ण इमारत सील करण्याची कारवाई सुरू आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.दरम्यान, नुकत्याच झालेल्या बुधवार पेठेतील ‘कोम्बिंग ऑपरेशन'(Combing Operation )बाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या आठवड्यात ३९ वेश्यागृहांमध्ये आणि ७०० व्यक्तींच्या झडतीत अल्पवयीन मुली आणि एक बांगलादेशी महिला सापडली होती. (Pune Budhwar Peth ) मात्र, पाच-सहा दिवसांतच मोठ्या संख्येने बांगलादेशी महिलांचा भंडाफोड़ झाल्याने त्या मोहिमेची प्रभावीपणा यावर शंका उपस्थित केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *