Pune : मोटार परिवहन विभागातील पोलीस उपनिरीक्षकाचे हृदयविकाराने निधन ; शोककळा पसरली

पुणे- प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलिस दलाच्या मोटार परिवहन विभाग (एमटी) मधील उपनिरीक्षकाचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना घडली. त्यांच्या निधनाने पोलिस दलात शोककळा पसरली आहे.(Pune News)

पोलिस उपनिरीक्षक राहुल हाळदे (Police Officer)असे या अधिकारांचे नाव आहे.(Rahul Halde )

हसतमुख असलेले राहुल हाळदे हे शुक्रवारी नेहमीप्रमाने कर्तव्य बजावत होते. दुपारी अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. तेव्हा सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालावली.(Maharashtra Police)

राहुल हे जयंती नियोजनासारख्या महत्त्वाच्या कामकाजात सक्रिय होते. ते कायम हसतमुख असत. त्यांच्या अश्या अचानक जाण्याने पोलिस दलात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *