पुणे -प्रतिनिधी
पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने हडपसरमधील ‘व्हाईट पर्ल स्पा’वर (White Pearl Spaa Hadpsar )छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून व्यवस्थापक सौरभ शामराव इंगळे (२८, काळेपडळ) (Shubham Ingale ) याला अटक (arrest)झाली. (Pune Crime)
१२ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे-सोलापूर (Pune Solapur Road )रोडवरील दशमेश कॉम्प्लेक्सजवळ बनावट ग्राहक पाठवून पडताळणी करून कारवाई करण्यात आली. स्पा मालकाविरुद्धही गुन्हा दाखल झाला असून महिलांना संरक्षण देण्यात आले आहे.
हडपसर पोलीस स्टेशनात (Hadpsar police station ) गुन्हा क्र. १०५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १४३(१)(३), ३(५) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३,४,५ अंतर्गत नोंद झाली. ही कारवाई आयुक्त अमितेश कुमार (Amitesh kumar) व गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.(Pune Crime)
