पुणे -प्रतिनिधी
खेड (Khed) तालुक्यातील राक्षेवाडी येथील खासगी कंपनीत मोबाईल वापराच्या वादातून संतप्त कर्मचाऱ्याने सहकाऱ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला चढवला. जखमीची गंभीर स्थिती असून खेड पोलिसांनी (Khed Police Station ) गुन्हा दाखल केला आहे.विशाल हिरामण तोत्रे (Vishal Tontre) (रा. राक्षेवाडी) यांनी कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर (Whatsapp Group) फोटो शेअर केल्याने अक्षय भगवान भांबुरे (रा. ढोरे भांबुरवाडी) याने त्याला अडवून डोक्यावर आणि हातावर वार केले.
काही दिवसांपासून चालू असलेल्या मोबाईल वापराच्या वादाने हा प्रकार घडला असून तोत्रे यांनी एचआर व्यवस्थापकाकडे तक्रारही केली होती.हल्ल्यानंतर भांबुरेने “पुढे तक्रार केलीस तर जीवे मारून टाकीन” अशी धमकी दिली. जखमीवर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू असून कंपनीत भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
