Supreme Court Bail : पुणे महाविद्यालयातील विद्यार्थ्याला बलात्कार व पोक्सो प्रकरणात हायकोर्टचा जामीन

पुणे -प्रतीनिधी

शिरगाव-परंद्वादी पोलीस ठाण्यात दाखल बलात्कार व पोक्सो गुन्ह्यात अडकलेल्या पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील २० वर्षीय विद्यार्थी रुद्रा अरुण वाघाये यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय दिला (Supreme Court Bail)
गतवर्षी १८ जून रोजी पीडितेच्या तक्रारीवरून बलात्कार व गर्भधारणा झाल्याचा गुन्हा दाखल झाला असून, आरोपी गेल्या वर्षभरापासून येरवडा तुरुंगात न्यायबंदी होता. अॅड. नितीन भालेराव (Supreme Court Bail ) व विपुल दुशिंग यांनी प्रेमसंबंध व खटला प्रलंबित असल्याचे सांगत जामिनासाठी अर्ज केला होता (Crime News)
. जामीन मिळाला असला तरी मुख्य खटल्याची सुनावणी सुरू राहील व न्यायालयाच्या सूचनांचे आरोपीला पालन करावे लागेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *