Pune Crime : हळदीच्या पाकिटांतून गांजाची विक्री ; बाणेर पोलिसांकडून दोघे गजाआड

पुणे -प्रतिनिधी

बाणेर पोलिसांनी (Baner Police) हळदीच्या पाकिटात लपवून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना सापळा रचून अटक केली, (Drug Seizure) आरोपींकडून १६ किलो गांजा आणि परदेशी चलन जप्त करण्यात आले.
याप्रकरणी अभिषेक बोरसे (२८, रा. पिंपरी-चिंचवड) आणि अक्षय बोरसे (२५, रा. पिंपरी-चिंचवड) यांना अटक करण्यात आली असून, बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.(Canna bisBust)

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हे बंधू दुचाकीवर बाणेर परिसरात येऊन गांजा विक्री करणार आहेत. (Pimpri Chinchwad)अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून आरोपींना पकडले आणि झाडती घेतली. अशा त्यांच्या पिशवीत हळदीची पाकिटे सापडली, ज्यात तपासणीत गांजा लपविलेला आढळला. तात्काळ तीन किलो गांजा जप्त करण्यात आला.(Narcotics)

चौकशीत आरोपींनी पिंपरी-चिंचवडमधील घरात आणखी स्टॉक असल्याचे सांगितले. (Pune Crime)पोलिसांनी घराची छापा टाकून १३ किलो अतिरिक्त गांजा जप्त केला. संशय टाळण्यासाठी हे बंधू खासगी कंपनीत नोकरी करत असत आणि शहरातील विविध भागांत गांजा विक्री करत होते.गांजाची खरेदीचा झरा आणि ग्राहकांची माहिती उघड करण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.

वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले, “अशी गुन्हेगारी रोखण्यासाठी सतर्कता वाढवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *