Pune Crime : प्रेम की दुसरं कारण? आकुर्डीत २३ वर्षीय तरुणाची व्हॅलेंटाईनला टोकाची घटना

पुणे -प्रतिनिधी

व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) दिवशी (Pune Crime )आकुर्डीतील गुरुद्वारा कॉलनीत २३ वर्षीय समर्थ संजय माळी या तरुणाने राहत्या खोलीत गळफास (Sucide) घेऊन जीवन संपवलं. मित्र बाहेर जेवणासाठी गेल्यावर एकट्याने हे पाऊल उचललं, अशी माहिती समोर आली आहे.मूळ सोलापूर जिल्ह्यातील समर्थ मित्रांसोबत भाड्याने राहत होता. शनिवारी दुपारी मित्र परत आल्यावर दरवाजा आतून बंद आढळला.

संशय येऊन आत गेल्यावर तो गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला.(Pune Crime) चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad) घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह (Death body) शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेला.प्राथमिक तपासात प्रेमसंबंधातील नैराश्य कारण असल्याचा संशय आहे, मात्र सुसाईड नोट सापडली नाही. समर्थचा मोबाईल तपास व मित्रांची चौकशी सुरू आहे. सोलापूरमधील कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून, पोलिस तपास करत आहेत.(pune crime)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *