पुणे -प्रतिनिधी
पुण्यात गुन्हेगारीने डोक वर काढले असताना आता लागो पाठोपाठ चौथ्या खुनाची माहिती वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Murder) हद्दीतून समोर येत आहे . कबूतर चोरीच्या (Pigeon Theft Killing) संशयावरून पाच जणांनी १९ वर्षीय तरुणाला लाथाबुक्या व लाकडी बॅटने मारहाण करून त्याचा खून केला . ही घटना रात्र मध्यरात्री घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे . (Pune Crime)
रूपेश धनराज शिंदे (Rupesh Shinde) (वय १९, रा. बोराटे वस्ती, मोशी, पिंपरी-चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात खूनाचा गुन्हा नोंद केला आहे. (Hadapsar Murder) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश व त्याचा मित्र अजय गणेश टिंगरे (वय २०, रा. मोशी, पिंपरी-चिंचवड) रात्री अडीचच्या सुमारास हडपसर येथून मोशी येथे दुचाकीने जात होते.(Pune Killings)
ते हडपसरमधील शंकरमठ येथून दुचाकीने जात असताना येथील पवार एन्क्लेव्ह सोसायटीसमोर थांबले. ही सोसायटी कॅनोल लगत आहे. तिथे कबूतर खाना आहे. दरम्यान, थांबल्यानंतर ते येथील एका कबूतराच्या पेटीजवळ गेले.(Bat Attack Murder ) मात्र, अचानक कुत्रे भुंकण्याचा आवाज आला. त्यामुळे दोघे पळाले. पण, पाच जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. रूपेश शिंदे मात्र, हा पळताना खाली कोसळला. तेव्हा, पाच जणांनी त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच, त्याला लाकडी बॅटने मारहाण केली. या मारहाणीत रूपेशचा मृत्यू झाला.(Maharashtra Crime)
