Pune Crime : पुण्याच्या कोथरूडमद्ये ‘सैराट’- कुटूंबाने ‘नागेश’ला संपवल- पुणे पुन्हा हादरले

कोथरूड – प्रतिनिधी

कोथरूड परिसरात अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध (Minor Girl Affair) असलेल्या नागेश संजय जाधव (२३, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) याला मुलीच्या घरच्यांनी लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी निर्घृण मारहाण करून हत्या (Kothrud Murder)केली.कोथरूड पोलिसांनी १० आरोपींना अटक केली असून आई सुरेखा जाधव (४५) यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, नागेश जाधव (Nagesh Jadhav) असे मृत तरुणाचे नाव आहे. नागेशचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. या संबंधाची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केल्याचे सांगितले जाते. यानंतर मुलीच्या मोबाईलवरूनच नागेशला मेसेज करून एका ठिकाणी बोलावून घेण्यात आले. नागेश त्या ठिकाणी पोहोचताच मुलीचे वडील आणि इतर नातेवाईकांनी त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत नागेश गंभीर जखमी झाला.(Maharashtra News)

दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले;(Pune Crime)मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर नागेशच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात मध्ये मुलीचे वडील तसेच इतर नातेवाईकांसह एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल (Kothrud Police)करण्यात आला आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी मृत तरुणाच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *