पुणे -प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील शिरूर (Shirur) तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. घरासमोर खेळणाऱ्या अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकलीवर गावातीलच अल्पवयीन मुलाने दुपारी लैंगिक अत्याचार केला आणि ‘तोंड उघडलं तर जीवे मारीन’ अशी धमकी देऊन पसार झाला.(8-year-old girl was tortured in Pune!)
सायंकाळी ताप आणि प्रकृती खालावल्याने रुग्णालयात (Hospital) नेल्यानंतर डॉक्टरांच्या तपासात अत्याचाराचा भेद उघड झाला आणि मुलीने सर्व कथन केले.शिक्रापूर पोलिसांनी (Shikrapur Police Station) संशयित अल्पवयीनला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असून, पीआय दीपरतन गायकवाड (Pi Deepratn Gaikwad) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पुण्यात वाढत्या महिला-मुलींवरील अत्याचाराच्या घटना, जसे कात्रजमधील खूनप्रकरण, चिंताजनक ठरल्या असून शहराची सुरक्षितता प्रश्नचिन्हावर आली आहे.
