पुणे -प्रतिनिधी
थेऊर (Theur)परिसरात विवाहानंतर अवघ्या काही महिन्यांतच चारित्र्य संशय, टोमणे, शिवीगाळ, मारहाण आणि रात्री-अपरात्री दोन चिमुकल्या मुलांसह घराबाहेर हाकलून देण्याचा क्रूर छळ झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात(Loni Kalbhor Police Station ) विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला असून पती भाऊ युवराज राखपसरे, दादा भीमा लोंढे, सीमा दादा लोंढे, लक्ष्मण भीमा लोंढे, कविता सुनील लोंढे (सर्व रा. थेऊर, ता. हवेली) अशी आरोपींची नावे आहेत. २३ वर्षीय विवाहितेने (Marriage) दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई झाली आहे .
पोलिस माहितीनुसार, पीडितेचा विवाह (Marraige )२४ मे २०२० रोजी थेऊर येथे भाऊ राखपसरे यांच्याशी झाला असता सुरुवातीला संसार सुरळीत होता. मात्र काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून संशय सुरू झाला आणि मुलगी झाल्यानंतर शारीरिक-मानसिक छळ तीव्र झाला. पतीच्या मोबाईलमधील आयटी कंपनीच्या महिलांशी प्रेमसंबंधाचे चॅट्स, व्हॉइस रेकॉर्डिंग (Whatsap Recording) व फोटो आढळल्यावर जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देत मारहाण झाली.
नातेवाईकांकडे तक्रारीवर “पुरुष आहे, जे वाटेल ते करेल” असे सांगून उलट पीडितेला शिवीगाळ करण्यात आली आणि घरकाम, अपमानावरून भांडणे व घराबाहेर काढणे नियमित झाले. फेब्रुवारी २०२५ च्या जत्रेत पती दुसऱ्या तरुणीसोबत असल्याचे उघड झाल्यावर पुन्हा मारहाण व धमकी मिळाली. (Pune crime) १२ डिसेंबर २०२५ रोजी देवकार्यावेळी खोटी माहिती दिल्याने बेदम मारहाण झाली असता आजी-आजोबांना बोलावल्यावर त्यांनाही शिवीगाळ करून दोन मुलांसह घराबाहेर हाकलले गेले.भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ३(५), ३५२, ८५ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत .
