Pune Mahanagarpalika : नवनिर्वाचित २४ नगरसेवकांवर न्यायालयीन तलवार, राजकारणात भूकंप

पुणे – प्रतिनिधी

नुकत्याच संपन्न पुणे महापालिका (Pune Mahanagarpalika) निवडणुकांमध्ये भाजपने १६५ नगरसेवकांपैकी ११९ जागांवर विजय मिळवला असला तरी या यशावर आता न्यायालयीन आव्हानांची सळत उमटली आहे. तब्बल २४ नवनिर्वाचित नगरसेवकांविरुद्ध (Nagarsevika)लघुवाद न्यायालयात अपात्रतेच्या याचिका दाखल झाल्या असून, निवडणूक निकालानंतर दहा दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. (Politics) जिल्हा लघुवाद न्यायालयाने या नगरसेवकांना समन्स बजावले असून, त्यांना पद वाचवण्यासाठी न्यायालयात सामोरे जावे लागेल.

याचिकांमुळे गुंतागुंतीत सापडलेल्या २४ नगरसेवकांबरोबरच महापालिकेत आणखी तीन नगरसेवकांविरुद्ध अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. सुधारित महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याच्या कलम १०(ड) नुसार आता निवडणुकीपूर्वी केलेल्या अनधिकृत बांधकामांनाही अपात्रता लागू होत आहे, ज्यामुळे त्यांच्या पदावर संकट कोसळण्याची शक्यता आहे.(Politics) प्रशासनाने या तक्रारींची प्राथमिक चौकशी सुरू केली असून, तथ्य सिद्ध झाल्यास पदरद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे जाईल.(Pune Mahanagarpalika)

तज्ज्ञांच्या मते, इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक न्यायालयीन प्रक्रियेत गुंतल्याने नव्या सभागृहातील निर्णयप्रक्रियेला अडचणी येऊ शकतात. भाजपच्या भव्य विजयावर या आव्हानांमुळे राजकीय वातावरण तापले असून, आगामी निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही प्रक्रिया पारदर्शकतेने चालू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *