Pune Mahanagarpalika : मनपा निवडणुकीत डिपॉझिट जप्तीचा रेकॉर्ड: ११५३ पैकी ७५० अपयशी

पुणे -प्रतिनिधी

जानेवारीत पार पडलेल्या पुणे महापालिका निवडणुकीत ११५३ पैकी ७५० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असून, यात शिंदे गटाच्या शिवसेनेने ८७ उमेदवारांसह अव्वल स्थान पटकावले. आपने ८१, काँग्रेसने ५० उमेदवारांचे डिपॉझिट गमावले, तर भाजपच्या ११९ जागा जिंकणाऱ्या पक्षातीलही ४ उमेदवारांचा समावेश आहे.(Pune Mahanagarpalika)

चार वर्षे रखडलेल्या या निवडणुकीत १६ जानेवारीला निकाल जाहीर झाले ज्यात भाजपने ११९, अजित गटाच्या राष्ट्रवादीने २७, काँग्रेसने १५ जागा जिंकल्या. शिंदे शिवसेनेने १२० (shinde gat shivsena) जागा लढवल्या पण एकही जिंकता आली नाही, तर ठाकरे गटाच्या ६२ पैकी ४२ चे डिपॉझिट जप्त झाले. अजित गटाच्या (Ajit pawar gat )१३९ पैकी १४ आणि शरद पवार गटाच्या ३४ पैकी १९ उमेदवारांचेही डिपॉझिट गेले, तर आपचे सर्व ८१ उमेदवार अपयशी ठरले.सर्वसाधारण जागांसाठी ५००० आणि आरक्षितसाठी २५०० रुपयांची अनामत रक्कम सरासरी मतांच्या एक अष्टांशपेक्षा कमी मिळालेल्यांकडून जप्त केली जाते. यात ३२८ पक्षीय आणि ४२२ अपक्षांसह छोट्या पक्षांचा समावेश आहे. भाजपचे हे ४ डिपॉझिट कोथिंडवा खुर्द-कौसरबाग प्रभागातील असून,(pune politics)

तिथे मुस्लिम उमेदवार विजयी झाले. ही आकडेवारी निवडणूक विभागाने जाहीर केली असून, अपक्षांची संख्या सर्वाधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *