Pune News : आखाड्यात धक्कादायक हल्ला: सिकंदर शेखवर मुळशी पॅटर्न

पुणे -प्रतीनिधी

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख (Maharshta Kesari Sikandar Shekh) यांच्यावर मुळशी तालुक्यातील पौड (Paud) येथे झालेल्या मल्लिकार्जुन कुस्ती स्पर्धेत आखाड्यातच हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली. १७ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivrsatri) आयोजित ११ लाख रुपयांच्या निकाली कुस्तीत माऊली कोकाटे यांच्याशी तासभर झुंज देताना आक्रमकतेने तणाव वाढला .
माऊलीचा समर्थक अचानक आखाड्यात घुसून सिकंदरवर हात उगारल्याने प्रेक्षकांमध्ये शिट्ट्या व गोंधळ उडाला.आंतरराष्ट्रीय पंच रोहिदास आप्पा यांच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या या लढतीत मानेवर प्रहार वाढल्याने दोन्ही पैलवान आमनेसामने आले.
सिकंदरचे गुरू विशाल हारगुले (Vishal Hargule) यांनी मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित केली, अखेरीस आयोजकांनी दोघांना संयुक्त विजेते घोषित केले . थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कुस्तीप्रेमींनी ‘मुळशी पॅटर्न’ला कलंक मानत कठोर कारवाईची मागणी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *