पुणे -प्रतिनिधी
यावर उपाय म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने आता ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची तयारी केली असून, 15 वर्ष जुन्या असलेल्या सुमारे 7 लाख वाहनांना पुण्याच्या मुख्य भागात प्रवेशबंदी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे.(15 year old car)
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (Jitendra Duddi) यांनी हा कडक पवित्रा घेतला आहे. सध्या पुण्याच्या रस्त्यांवर अशी 7 लाख वाहने धावत आहेत, जी 15 वर्षांहून अधिक जुनी आहे. ही वाहने केवळ प्रदूषणच वाढवत नाहीत, तर जुन्या इंजिनमुळे ती अनेकदा ऐन गर्दीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध बंद पडतात. यामुळे होणारी वाहतूक कोंडी बराचवेळ सुटत नाही. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास, 15 वर्षांहून अधिक जुनी पुण्यात दिसून येणार नाही.(Pune)
