Pune News : विवाहानंतर पतीकडून शारीरिक संबंधाना टाळाटाळ; पत्नी न्यायालयात तक्रार , नंतर …

पुणे -प्रतिनिधी

पतीने शारीरिक संबंध प्रस्थापित न केल्याने पत्नीने कौटुंबिक न्यायालयात विवाह रद्द (Marriage Cancel )करण्याची विनंती केली असता, न्यायाधीश बी. डी. कदम यांनी त्वरित दिलासा दिला. उच्चशिक्षित पुण्यातील या दांपत्याचा ‘विशेष विवाह कायदा १९५४’ अंतर्गत नातेवाइकांच्या मध्यस्थीने विवाह झाला. मात्र लग्नानंतर पती वारंवार संबंध टाळत असल्याने पत्नी निराश झाली आणि माहेरी परतली.(Pune News)

न्यायालयीन प्रक्रियेत पतीने लेखी जबाबात बिनशर्त कबुली दिली की, दोघांमधे कोणतेही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत. तथ्यांवर वाद नसल्याने दीर्घ सुनावणी टाळून न्यायालयाने विवाह रद्द करण्याचा आदेश दिला. पत्नीचे वकील ॲड. धनंजय जोशी (Adv .dhnanjay Joshi )यांनी सांगितले की, अशा प्रकरणात लेखी कबुलीवरून त्वरित निर्णय घेता येतो, ज्यामुळे पक्षकारांना लवकर न्याय मिळतो आणि न्यायालयीन वेळ वाचतो (Law)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *