पुणे – प्रतिनिधी
शहरात जबरी चोरीच्या वाढत्या घटनांवर ताबडतोब नियंत्रण मिळवण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट-१(Crime Branch Unit 1) ने राबवलेल्या विशेष मोहिमेत दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली. यामुळे सोमवार पेठ आणि कॅम्प परिसरातील दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली.
पोलिस हवालदार हेमंत पेरणे (Pc Hemant Perane)आणि अंमलदार निलेश साबळे (Pc Nilesh Sabale) यांच्या पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या माहितीवरून कारवाईला उड्या मारण्यात आल्या.वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हडपसरच्या नवीन म्हाडा कॉलनीतील अस्लम शेख उर्फ बिल्ला (२०) आणि रेहान शेख यांना त्यांच्या घरी छापा टाकून ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांनी आठ दिवसांपूर्वी सोमवार पेठेतील शांताई हॉटेलजवळ ॲक्टिवा स्कूटरवरून एका व्यक्तीच्या खिशातून ३० हजार रुपये जबरीने हिसकावल्याची कबुली दिली.
समर्थ पोलीस ठाण्यात (samarth Police Station) दाखल या गुन्ह्याची उकल झाली असून, अस्लमवर शहरात २१ गुन्हे नोंदले गेले आहेत.कॅम्प परिसरातील शरबतवाला चौक येथील दुसऱ्या चोरीचा गुन्हाही अस्लमने कबूल केला, ज्याची नोंद लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे (Dcp NiKhil Pinhgale )आणि सहाय्यक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे(Psi Rahul Makhare), अंमलदार निलेश साबळे, हेमंत पेरणे, अनिकेत बाबर, मयुर भोसले, उमेश मठपती आणि महिला अंमलदार ज्योती मुल्का यांचा समावेश होता. पुढील तपास सुरू आहे.(Pune Police)
