Pune RTO : पुणे आरटीओचा बेशिस्त वाहनचालकांना दणका: गेल्या वर्षी ३,६०० परवाने निलंबित

पुणे -प्रतिनिधी

वाहतूक नियमांचे (Traffic Rules ) उल्लंघन करणाऱ्या चालकांवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कडक कारवाई केली. मागील वर्षात सिग्नल तोडणे, जास्त वेगाने वाहन चालवणे, मालवाहूतून प्रवासी वाहतूक अशा गुन्ह्यांमुळे ३,६०० वाहन परवाने निलंबित करण्यात आले. निलंबित परवान्यासह वाहन चालवल्यास ५ हजार दंडपरवाना निलंबित झालेल्या चालकाला पुन्हा वाहन चालवताना आढळल्यास ५ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असे आरटीओने स्पष्ट केले. (Pune RTO)

निलंबनाची माहिती आरटीओ पोर्टलवर अपलोड होते,(Pune RTO) ज्यामुळे विमा क्लेमही नाकारला जाऊ शकतो. पुणे वाहतूक पोलिस, महामार्ग पोलिस व अन्य राज्यांच्या अहवालांवरून ही कारवाई मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९ अंतर्गत झाली.(Traffic Rules) पुढील कारवाईचे संकेतउपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले, आणखी ३ हजार परवाने निलंबित होणार असून रस्ते सुरक्षेसाठी सातत्यपूर्ण कारवाई सुरू राहील. दारू पिऊन वाहन चालवणे, मोबाईल वापर, जास्त माल वाहतूक यांसारख्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *