पुणे – प्रतिनिधी
नागरिकांच्या तीव्र मागणीनुसार रामटेकडी (Ramtekdi Police Chowki )परिसरात बांधकाम व्यवसायात अग्रेसर नाईकनवरे कुटुंबीयांच्या वतीने नवीन पोलीस चौकीचे भूमिपूजन पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांच्या हस्ते यशस्वीरीत्या पार पडले.(bhoomi Pujan ) हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, झोन पाचच्या उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके, नगरसेविका हेमलता मगर तसेच हेमंत, रणजित व गौरी नाईकनवरे उपस्थित होते.
नवीन पोलीस स्टेशन व मनुष्यबळ वाढ
पुण्यात गेल्या वर्षी राज्य सरकारने १२ नवीन पोलीस स्टेशनांना मंजुरी दिली असून, शहरात १८०० नवीन पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होत आहे. या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नवीन स्टेशनना आवश्यक मनुष्यबळ मिळेल, असे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. रामटेकडी भागातील ३० हजार नागरिकांच्या वस्तीत अवैध धंदे व १० वर्षांखालील गुन्हेगारांची यादी तयार करून सुधारणा करण्याचे व पुनः सुधारणा न झाल्यास परेड काढण्याचे कडक आदेश त्यांनी दिले.(Pune Police)
घटना घडल्यानंतर तात्काळ कारवाई
ऑक्टोबर महिन्यातील एका घटनेनंतर स्थानिक शिष्टमंडळाने भेट देऊन पोलीस चौकीची मागणी केली होती. अवघ्या २४ तासांत कंटेनरमध्ये चौकी सुरू करण्यात आली. रामटेकडीत गुन्हेगारी हद्दपार करून रामराज्य निर्माण करण्याचा आमचा निर्धार असल्याचे कुमार म्हणाले. तसेच महापालिका नगरसेवकांनी प्रभागातील ड्रग्स व अवैध धंदे मुक्त करण्याची योजना आखावी, ही सूचनाही त्यांनी केली.(Pune Safety)
तीन मजली चौकीने वाढेल सुरक्षा
नवीन पोलीस चौकी तीन मजली असेल, ज्यामुळे रामटेकडीची सुरक्षा बळकट होईल. रामटेकडीतील महापालिका शाळेचे नूतनीकरण क्रेडाईसारख्या संस्थांनी हाती घ्यावे, असे आमदार चेतन तुपे (Chetan Tupe ) यांनी सांगितले. झोपडपट्टी पुनर्वसनासाठी राज्य सरकारची उत्तम नियमावली उपलब्ध आहे. या भागात रुग्णालय, मल्टिप्लेक्स व मुलांसाठी निशुल्क वर्गांच्या सुविधा उभारण्याचे नाईकनवरे कुटुंबीय प्रयत्नशील आहे.
लवकरच पूर्णत्वास जाईल बांधकाम
रामटेकडी पोलीस चौकीचे बांधकाम लवकर पूर्ण करून येत्या दसऱ्याला उद्घाटन करण्याचा मानस असल्याचे रणजित नाईकनवरे यांनी आभार प्रदर्शनात घोषित केले. या उपक्रमाने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला चालना मिळेल व विकासाला गती लाभेल.
