Pune : मॅट्रिमोनी साइटवर तो भेटला … प्रेमाच्या जाळ्यात ओढलं ; लग्नाच स्वप्न दाखवलं … विश्वास संपादन केला अन् तरुणीकडून ६० लाख रुपये घेऊन पसार झाला

पुणे – प्रतिनिधी

 

पुण्यातील वडगाव शेरी येथील ४४ वर्षीय महिलेची विवाहाच्या आमिषाने मॅट्रिमोनी (Matrimonial) साइटवर ओळख झालेल्या आरोपी विराज बाळासाहेब भोसले  (Viraj Balasaheb Bhosale ) उर्फ सतीश बुरूड (रा. तळेगाव दाभाडे) व सहा जणांनी तब्बल ५९ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केली.(Crime News)
नोव्हेंबर २०२४ मध्ये संकेतस्थळावर संपर्क साधून लग्नाचे आश्वासन देऊन वैयक्तिक अडचणी सांगत दीड वर्षांत विविध हप्त्यांमध्ये रक्कम उकळली गेली महिलेने लग्नाबाबत ठोस निर्णय मागितल्यावर टाळाटाळ, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी मिळाली, अखेरीस संपर्क तोडून पळ काढला. चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदल्यानंतर आठ आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, बँक खाती व मोबाईल रेकॉर्ड तपास सुरू आहे .(Pune Crime)
या घटनेमुळे ऑनलाइन विवाह संकेतस्थळांवर (Online Marriage Website) पार्श्वभूमी तपास व आर्थिक व्यवहार टाळण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *