Rajpal Yadav : राजपाल यादवचं दिग्दर्शनातील स्वप्न तुटलं

पुणे – प्रतिनिधी

११ कोटींच्या चित्रपटाने (film )आणलं तुरुंगवास‘हेरा फेरी’, ‘भागमभाग’, ‘भुलभुलैया’(bhulbhulaiyya )सारख्या हिट चित्रपटांत विनोदी भूमिका साकारून लाखोंना हसवणारा अभिनेता राजपाल यादव सध्या कठीण काळातून जातोय. पहिल्यांदा दिग्दर्शित केलेल्या ‘अता पता लापता’ (२०१२) चित्रपटाने त्याला आर्थिक संकट आणि तुरुंगवास फटका दिला.स्वप्नाचं रूपांतर संकटात(Rajpal Yadav)
राजपालने या चित्रपटात दिग्दर्शनासह मुख्य भूमिका केली. ११ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box office) फक्त ३८ लाख कमावला. अपयशामुळे कर्जाचा बोजा वाढला; दिलेल्या चेक बाउन्स झाले. कोर्टाने तिहार तुरुंगात आत्मसमर्पणाचा आदेश दिला, जिथे रडताना त्याला आत्मसमर्पण करावं लागलं.अनुभवाचा अभाव महाग
दिग्दर्शक अनीस बाज्मी म्हणतात, “कलाकारांना करार व कागदपत्रांची गुंतागुंत नीट समजत नाही. उत्साह आणि महत्त्वाकांक्षेतून घेतलेले निर्णय अनुभवाशिवाय महागात पडतात.” राजपालसारख्या दिग्गजाला ही शिकवण मिळाली.पडद्यावर हास्याची लाट आणणारा हा कलाकार आता करिअरची पुनर्रचना करतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *