पुणे -प्रतिनिधी
पुण्यातील बाणेर परिसरात (Baner Area)रिडेव्हलपमेंट प्रकल्पाच्या वादातून सेवानिवृत्त अधिकारी नरेश उमाकांत महाजन (Naresh Mahajan) यांनी अर्धवट इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या (Death) केली. बाणेर पोलिसांनी बिल्डर जयंतीलाल ओसवाल आणि ऋषभ ओसवाल यांच्याविरुद्ध फसवणूक व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
महाजन हे महावितरण कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी बाणेरमधील स्वतःची जमीन रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डरकडे दिली होती. करारानुसार प्रकल्प पूर्ण झाल्यावर सदनिका मिळायला हव्यात, पण बांधकाम रखडले आणि अटी पूर्ण झाल्या नाहीत. वारंवार पाठपुरावा केल्यानाही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने ते मानसिक तणावात होते.घटना घडलेल्या दिवशी त्यांनी प्रकल्पस्थळी जाऊन बिल्डरशी चर्चा केली, तेव्हा धमकी मिळाल्याचा आरोप आहे.(Crime)
घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत फसवणूक आणि मानसिक त्रासाचा उल्लेख आहे. कुटुंबीयांनी बिल्डरवर कठोर कारवाईची मागणी केली असून, पोलिस तपास करीत आहेत.
