पुणे -प्रतिनिधी
राज्यभर जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या (zp election) निकालांच्या तयारीत व्यस्त असताना मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar ) यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली. गोविंदबागेतील निवासस्थानातून कार्डियाक अॅम्ब्युलन्ससह पुण्यातील खासगी रुग्णालयाकडे त्यांचा ताफा दुपारी रवाना झाला.गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ते सार्वजनिक कार्यक्रम टाळत होते.
अजित पवार (ajit pawar)यांच्या अपघाती निधनानंतर मात्र जनतेच्या भेटीगाठी सुरू केल्या. गेल्या आठवड्यात तीन दिवस सहयोग सोसायटीला (अजित पवार यांचे निवासस्थान) घालवले. या दगदगीमुळे थकवा आणि खोकल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.सकाळपासून गोविंदबागेत डॉक्टरांचे पथक तपासणीसाठी दाखल होते. तासभराच्या तपासणीनंतर पुण्यात उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. मास्क लावून वेगळ्या गाडीने निघाले. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरातून नेते-कार्यकर्ते बारामतीत (baramati) येत असल्याने आठ दिवसांपासून शरद पवार यांच्यावर अतिरिक्त ताण पडल्याची माहिती आहे.
