पुणे -प्रतीनिधी
पुण्यातील कात्रज डेअरी चौक (Katraj Dairy Chawk) परिसरात शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात जुपिटर मोटार मोपेड (जीजे ०१ पीझेड १३७४) चालवत असलेल्या प्ररिमा प्रधान (Pralima Pradhan ) (वय ३८, रा. श्रीज्वेल सोसायटी, कात्रज कोंढवा रोड) यांचा हायवा डंपरच्या (एमएच १२ वाय क्यू ७२५९) धडकेत जागीच मृत्यू (Deayth )झाला. धडकेनंतर त्या डंपरच्या पाठीमागील टायरखाली सापडल्याने हा स दुर्दैवी प्रकार घडला .
घटनेची माहिती मिळताच कात्रज पोलीसांनी तात्काळ डंपर चालकाला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. मृतदेह (Death body) शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून अपघाताचे (Accident) नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलिस तपास करीत आहेत
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून रस्त्यावरील सावधगिरीची गरज अधोरेखित झाली आहे
