Smriti Maandhana’s : लग्नाचे नाते तुटल्यानंतर 3 महिन्याने ,स्मृती मानधनाची भावनिक पोस्ट

पुणे -प्रतिनिधी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Austrelia) तिसऱ्या टी-२० सामन्यात ५५ चेंडूत ८२ धावांची झंझावाती खेळी करून भारताला विजय मिळवून देणारी स्मृती मानधना सध्या वैयक्तिक आयुष्यातील वादळ आणि मैदानावरील यशामुळे चर्चेत आहे.मालिका विजयानंतर अवघ्या २४ तासांत तिने इंस्टाग्रामवर भावनिक (Emotional Post) स्टोरी शेअर करून लिहिले, “खेळाला तुमच्या भावनांची पर्वा नाही. हे कटू सत्य आहे.(Smriti Maandhana’s)

थकलेले असाल, अनुभवी असाल की नवखे, याने फरक पडत नाही. खेळाला फक्त त्या दिवशीची कामगिरी हवी असते.” या शब्दांतून खेळाडूवरील मानसिक दडपण आणि व्यावसायिक कठोरता जाणवते.काही महिन्यांपूर्वी संगीतकार पलाश मुच्छल यांच्याशी नोव्हेंबर २०२५ मध्ये होणारे लग्न वडिलांच्या आरोग्य समस्या आणि वैयक्तिक मतभेदांमुळे रद्द झाल्याची चर्चा आहे.

मानसिक संघर्षातून सावरताना क्रिकेटनेच तिला आधार दिला, असे स्मृतीने मुलाखतीत सांगितले. “अस्वस्थ असताना बॅट हातात घेतल्यावर शांत वाटते. जर्सी घालून सर्व दुःख विसरते,” असे तिचे मत आहे.वैयक्तिक संकट असतानाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तिच्या जिद्दीने चाहत्यांना प्रेरणा दिली असून क्रीडा विश्वातून कौतुक होत आहे.(Cricket Lovers)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *