Interview तर, तुम्ही जग बदलू शकता – समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विशाल विशाल लोंढे

प्रिया गायकवाड

पुर्वीच्या काळात शिक्षणाचे महत्वही नव्हते आणि सहज शिक्षणाचा लाभही मिळत नव्हता किंवा घेता येत नव्हता, पण, ज्यांच्याकडे शिक्षण होत त्यांच्यातील आत्मविश्वास प्रचंड दिसून यायचा आणि त्या उलट ज्यांच्याकडे शिक्षण नाही, त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी जाणतयत असत. त्यामुळे चाकरी करणाऱ्यांची संख्या जास्त होती, माहिला तर चूल आणि मूलयाच नियमात असत. पण, अशा काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि जो हे दूध पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे सांगल शिक्षणाचे महत्व पटवून दिले. एका विशिष्ट रेषेच्या बाहेर विचार करणे म्हणजे तेव्हा गुन्हा समजल्या जात होता. परंतु, या कालियुगात समाजाला बाहेर काढण्याचे काम क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यांनी शिक्षणाचा अंधकार दूर केला. त्यासाठी त्यांनी दगड, धोंडे, शेण आपल्या शरीरावर घेतले. त्यांनी समाजात शिक्षणाच्या प्रकाशाची ज्योत पेटवली. शिक्षणाचे महत्व माणसाच्या जीवनात खूप मोठे आहे. संत गाडगे बाबा यांनी सुध्दा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्व सांगितले. अशा अनेक थोर महात्म्यांनी शिक्षणासाठी आपले आयुष्य खर्च केले आणि त्याचे महत्व समजाला पटवून दिले, असे मत शिक्षणाबाबत समाजकल्याण विभागाचे तरुण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी व्यक्त केले. समाजकल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी पोलीस वारंटसोबत मनमोकळा संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिक्षणाचे महत्व सांगताना आपले विचार मांडले. ते म्हणाले, मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून शिक्षण घेत अधिकारी झालो, माझी आई दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडयाचे काम करायची तेव्हा माझ्या डोक्यातही अधिकारी व्हावे, असा विचार नव्हता. परिस्थिती हालाकिची होती. आलेल्या दिवसाला सामोरे जात होते. परंतु, आईचे कष्ट दिसत होते. काही तरी करण्याची जिद्द होती. यशाचा मार्ग आपणच शोधवा लागतो, हे जेव्हा समजले. त्यावेळी मग, शिक्षण व नौकरी अशा मानसिकतेत आलो. शिक्षण घेतले आणि नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करू लागलो. प्रथम २०१२ मध्ये समाजकल्याण विभागात क्लार्क म्हणून नोकरी मिळवली. तरीही मनात आणखी काही तरी करण्याची इच्छा होती.(Interview)

क्लार्कचे काम करताना समजल की, पुढेही परीक्षा देता येते. मग, तो प्रवास सुरू केला. नोकरी आणि पुढील अभ्यास असा ताळमेळ बसविला. प्रचंड मेहनत घेतली. जून २०१३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. तर, जुलै २०१३ मध्ये सेल्स टॅक्स इंस्पेक्टर म्हणून आणि डिसेंबरमध्ये फूड कपिरिशन ऑफ इंडियाला असिस्टंट म्हणून निवड झाली होती. आता उपनिरीक्षक पदावर रूजू होऊ असे बाटत होते. त्यानूसार, ज्यादिवशी रुजू होणार, त्याचदिवशी समाजकल्याण विभागाचा निकाल लागला आणि सहाय्यक आयुक्त झालो.

(vishal londhe )

उपनिरीक्षक न होता, सहाय्यक आयुक्त झालो.

तरुणांनी आत्मविश्वास बाळगावा. कष्टाशिवाय यश मिळू शकत नाही. आयुष्यात कधीतरी अडचणी पाहून निराश वाटू लागल्यास ही वाक्य नक्की स्वताला सांगा. आयुष्यात अडचणी येतात. पराभव हा प्रयत्न न करणान्याचाच असतो. त्यामुळे संघर्षाला न घाबरता आपली भूमिका बजावून ध्येयाकडे वाटचाल करत रहा.

समाजकल्याण सहाय्यक आयुक्तविशाल लोंढे यांच्या विषयी

Info Box

Click here to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

नागरिकांसाठी ऑफिस खुले करणारा अधिकारी तरुण पिढीची इन्सपिरेशन आजवर पूर्वी अनेकाना समाजकल्याण अधिकारी कोण आहे हे माहीत नसायचे, परंतु आज पुण्याचा तरुण पिढीचा लोकप्रिय अधिकारी म्हणून विशाल लोंढे याचे याचे नाव चर्चेत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *